समृद्धी महामार्गामुळे लासुरच्या गायरानधारकांची मात्र अधोगती...गायरान धारक बसणार उपोषणाला. गंगापूर प्रतिनिधी( प्रकाश सातपुते) 

गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथिल गट नंबर 28 मध्ये एकूण 55 एकर गायरान क्षेत्र असून ही  सर्व गायरान जमीन 1989 पासून गावातील गरीब एस.सी., एस.टी समाजातील लोक कास्त करून आपल्या कुंटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण करत आहेत मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील समृद्धी महार्गाने या गायरान धारक कास्तकाऱयांचे जीवन  मात्र उध्वस्त होण्याच्या मार्गावर प्राथमिक स्तरावर दिसत आहे.
                                   या गायरान जमिनीतून समृद्धी महामार्ग गेल्याने याच गायरान जमिनीतील काही सातबाराधारक  लोकांना लाखो रुपये मिळाल्याने त्याना सुगीचे दिवस आलेत मात्र याच लोकांबरोबर गायरान जमिन कास्त करूनसुद्धा तात्कालीन महसुली अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबध न जोपासल्याने  चुकीच्या माहितीमुळे काही गायरान अतिक्रमनधारक  शेतकरी अद्यापही या मोबदल्यापासून वंचीत राहिले आहे केवळ नावे सातबारा नसल्याने समृद्धी महामार्गात कसत असलेले गायरान संपादित झाले असूनही या गायधारकांचे  कुंटुब उघड्यावर पडले असून उदरनिर्वाहसोबत मुलाबाळांचे शिक्षनही अर्धवट सोडण्याची नामुष्की आली असून आत्ता शिल्लक राहिलेले गायरान नावावर करणे सोडाच परंतु पुन्हा जिल्हाधिकारी यांनी गायरान जमीनीचा मुरूम उत्खनन करून समृद्धी मार्गासाठी वापरण्याचे आदेश दिल्याचे समजताच गायरान धारक कुंटुब ऐन कोरोनॉच्या काळात आर्थिक संकटात सापडला असून लासुर स्टेशन येथील ग्रामविकास अधिकारी देविदास ढेपले यांना लेखी निवेदन देऊन आम्ही कास्त करीत असलेले गायरान जमीनीतून मुरूम,माती,उत्खनन करू नये अशी मागणी केली आहे.
                     दरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन आमच्या उभ्या पिकाचा पंचनामा सादर करून वरिष्ठ अधिकारी यांना कळवावे व आमच्या नावावर गायरान जमिनीचा सातबारा देऊन समृद्धी महामार्गासाठी संपादित झालेल्या जमिनिचा मावेजा आम्हाला द्याव  नसता आठ दिवसात याच समृद्धी महामार्गवर उपोषनास बसण्याचा इशारा प्रशासणाला देनार असल्याचे या गायरानधारक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

Post a comment

0 Comments