उमरीत भाजपाच्या महिला मोर्चाच्या वतीने आधुनिक नवदुर्गा सन्मान प्रमाण पञाचे वाटप

उमरी:-  भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली व नांदेड जिल्हा ग्रामीण च्या जिल्हाध्यक्षा चिञलेखा शाहूराज पाटिल गोरे यांच्या नेञत्वाखाली जिल्हा सरचिटणीस प्रेमलताताई आग्रवाल,उमरीचे महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा प्रणिता शरद जोशी, शहरध्यक्षा अनिता  अंनतवार, शहर युवाध्यक्षा अंबिका हेमके, ओबीसी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुनिता पोपटेलवार, जिल्हा चिटणीस, शुभांगी पाळेकर, माजी नगरसेविका सुनिता श्रीरामवार, सुमनताई हेमके, आधिच्या सहकार्याने आमदार राजेश पवार यांच्या जनसर्पक कार्यालयात आधुनिक नवदुर्गा महिलांना  सन्मान पञ वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यालयाचे अध्यक्षा उमरी शहराच्या नगराध्यक्षा अनुराधा सदानंदराव खाडंरे,तर प्रमूख पाहुणे जुईताई कैलासराव देशमुख गोरठेकर, हे उपस्थितीत होते. यावेळी उपस्थितीत सर्व मान्यवर महिलांच्या हस्ते अधुनिक नवदुर्गा प्रमाणपञाचे महिला मानकरी योग अभ्यासीका शारदा येम्मेवार,  ब्रम्हकुमारी माधुरी बहेन, अंगणवाडी सेविका,सुभद्राबाई लाब्दे, पोलीस कर्मचारी महिला शांता शिंदे, वैद्यकिय सेवा डाॅ चैताली कदम, शेतकरी महिला  चंद्रकला सलगरे,माजी सैनिक शशिकला वडजे, समाजसेविका नगनुरवार ,शिक्षिका  स्वाती वच्चेवार आदीं ठरल्या यावेळी महिला सुरक्षा व सबलिकरण सह अनेक विषयांवर उपस्थितीत महिला चर्चा करण्यात आले.

Post a comment

0 Comments