शिवशाहू यात्रा' काढणार- संभाजीराजे

कोल्हापूर : “दक्षिण दिग्विजयला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटगावच्या मौनी महाराज मठात आशीर्वाद घेतला होता.

आशीर्वाद आपण आज मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी घेतलाय आणि त्यामुळे एक वेगळीच ताकद मिळाली”, असं सांगतानाच समाजात जातीय विषमता वाढत असल्याने आपण लवकरच 'शिवशाहू यात्रा' काढून संपूर्ण राज्य पिंजून काढणार असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. भुदरगड तालुक्यातील पाटगाव ते आदमापूरपर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीने आज संघर्ष यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी हा मनोदय व्यक्त केला. 

“इसीबीसी विषयावर मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेली भूमिका ही माझी एकट्याची नाही, तर सकल मराठा समाजाची आहे. दहा टक्के आरक्षण घ्यायचं होतं, तर मग मोर्चे आणि बलिदान कशासाठी दिलं”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. समाजात जातीय विषमता वाढत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात शिवशाहू यात्रा काढण्याचा आपला विचार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.

Post a comment

0 Comments