माझ्या तोंडी नको ते शब्द घालू नका, राजेंचं वेगळं राजकारण असावं : विजय वडेट्टीवार

मुंबईः मी संभाजीराजेंना ओबीसीत येण्याबाबत अजिबात ऑफर दिलेली नाही, आमच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, असं विधान मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. 
मी जे बोललो नाही ते माझ्या तोंडी टाकणं चुकीचं आहे. संभाजीराजेंनी असं का केलं हे त्यांना माहिती असेल, त्यांचं वेगळं राजकारण असावं. राज्य सरकार मराठा समाजावर अन्याय करत नाही, सरकारने न्यायालयात फौज उभी केली, मराठा समाजासाठी ओबीसींऐवजी स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावं, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. 

Post a comment

0 Comments