जलकुंभाचे काम लवकर सुरु करा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली मागणीपैठण (प्रतिनिधी विजय खडसन )- -
 पैठण शहरातील प्रभाग क्र.१० व ११ मधील मंजूर असलेल्या जलकुंभाचे काम तात्काळ सुरू करा या मागणीचे पत्र सर्वपक्षीय नगरसेवक यांनी हासनोद्दिन कट्यारे, गट नेता न.प. पैठण याच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांच्या कडे केली आहे.

पैठण शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत चार जलकुंभाचे काम मंजूर झाले त्यापैकी नारळा व नवीन कावसान भागातील जलकुंभाचे काम प्रगती पथावर असून अंतिम टप्प्यात आहे.दोन जलकुंभ हे अल्पसंख्याक मुस्लिम बहुल व मागासवर्गीय प्रभागातील असल्याने मुद्दामहुन त्यांचे काम केले जात नसल्याचा आरोप सर्व पक्षीय नगरसेवकांनी केला आहे. पैठण शहरातील नेहरू चौक व जुनी तहसील भागात ७ लाख ५० हजार लिटर क्षमता असणाऱ्या दोन पाण्याच्या टाक्या मंजूर करण्यात आल्या मात्र या जलकुंभाचे अद्याप ही काम सुरू करण्यात आले नाही. सदरील कामाचा ठेकेदार हा या ठिकाणी भेट देऊन परत जातो पण काम सुरू करत नसल्याचा आरोप केला आहे.
जुन्या तहसीलची जुनी पाण्याची टाकी कोणत्याही क्षणी कोसळू शकते त्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते. करीत सर्वपक्षीय नगर सेवक यांनी नगरपरिषद गटनेता हसनोद्दिन कट्यारे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे, कल्याण भुकेले, तुषार पाटील, आबा बरकसे, मैमूना बुऱ्हाण बागवान, महेमुदा बादशहा शेख, ज्ञानेश घोडके, बजरंग लिंबोरे, अलकाबाई परदेशी, विष्णू बाबर, अजित पगारे, नुरहत टेकडी आदी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या होत्या.
----------------------------------------------------------------------
नगर परिषदेने जलकुंभासाठी निश्चित केलेल्या जागे बाबत वाद निर्माण झाल्याने जलकुंभाचे काम थांबवण्यात आले आहे. जागेच्या बाबतीत नगर पालिका प्रशासनाने मध्यस्थी करून ती जागा आमच्या म्हणजेच जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात द्यावी म्हणजे आम्हाला काम चालू करता येईल.

   पथरीकर
शाखा अभियंता
जीवन प्राधिकरण,औरंगाबाद

------------------------------------------------------------------

Post a comment

0 Comments