कारने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दोन तरुण जखमी

सिल्लोड:-  भरघाव कारने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील माणिक नगर जवळ झाला. दरम्यान यात एक जण गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे.
 आनंदा गणपत फुके ( १९ रा. धानोरा) व संतोष सुखदेव पवार ( २२ रा. तलवाडा) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. यात संतोष पवार गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. 
 दुचाकीवर (क्रं. एमएच- २०, ईव्ही- २२७३) आनंदा व संतोष सिल्लोडला जात होते. याच दरम्यान क्वीड कंपनीची कारने (क्रं. एमएच- २०, डीव्ही- ६८१२) विठ्ठल मुरलीधर दगडघाटे व रविंद्र लक्ष्मण अंभोरे (दोघे रा. चारनेर) औरंगाबादला जात होते. कारने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे तरुण जखमी झाले. अपघात होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या अपघाताची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास बीट जमादार दादाराव पवार करीत आहे.
कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर उलटून रस्त्याच्या बराशीतील रोहित्राच्या खांबाला धडकली. यात कारचा अक्षरशः चुराडा झाला. परंतु याच दरम्यान ईअर बॅग उघडल्याने कारमधील विठ्ठल दगडघाटे, रविंद्र अंभोरे बालंबाल बचावले. रस्त्यावरील येणारे- जाणारे अपघात ग्रस्त कार पाहून काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी चर्चा करीत होते.  

Post a comment

0 Comments