शाळा बंद पण अभ्यास चालु शिक्षक दारवंटे व बहाळस्कर यांचा घरपोहच उपक्रम
वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन)  :

गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत.ऑनलाइन शिक्षणाला महत्व प्राप्त झाले आहे पण प्रत्येक मुलाकडे फोन उपलब्ध नाही आणि म्हणूनच खंडाळा येथील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्यध्यापक ई बि गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक अशोक दारवंटे व ज्ञानेश्वर बहाळस्कर यांनी चक्क मुलांना अभ्यास त्यांच्या घरी,शेतात मिळेल त्या ठिकाणी शिकविण्यास सुरुवात केली आहे.ज्यामुळे ज्या मुलांना मोबाईल उपलब्ध नाही त्यांचे नुकसान होणार नाही हा उद्देश ठेऊन हे दोन शिक्षक प्रामाणिक पणे शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे अन जर त्याने ठरवलं तर तो विद्यार्थ्याला अंधाराकडून उजेडाकडे नेऊ शकतो.मुलांचा गृहपाठ तपासणे,विषय घटक समजावून सांगणे.हे सर्व  असताना सामाजिक अंतराचे पालन करत व  तोंडाला मास्क चा वापर  करून मुलांचा अभ्यास घेताना शिक्षक आढळून येतात.अश्या विद्यार्थी प्रेमी व शिक्षण प्रेमी शिक्षकांनि मुलांना सुद्धा कोरोनाबाबत कशी काळजी घ्यावी हे सुद्धा समजावून सांगितले आहे.

Post a comment

0 Comments