'ऐशी वर्षांच्या योद्ध्याची बळीराजासाठी धडपड'

मुंबई:- अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. अशात आपल्या बळीराजाला धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.
खरंतर, शरद पवार हे मराष्ट्रातल्या राजकारणातलं मोठं नाव आहे. ते 79 वर्षांचे आहेत. पण तरीदेखील एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीने ते आजही काम करतात.कोरोनाच्या संसर्गातही आपल्या जीवाची परवा न करता शरद पवार हे बळीराज्याच्या भेटीसाठी गेले आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी मुक्तपणे संवाद साधला.
आज तुळजापूरमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर काकांब्रा, लोहारा, सास्तूर या गावांचा दौरा करत शरद पवार मार्गक्रमण करत आहेत.
या गावांना भेटी देताना शरद पवार यांनी रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली.
इतकंच नाही तर शरद पवार भेटून गेल्यामुळे आपल्याला मदत मिळेल अशी अपेक्षाही बळीराजाला आहे. शरद पवार रविवार आणि सोमवार हे दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.

Post a comment

0 Comments