विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्यानं तरुणीची आत्महत्या

कोल्हापूर:-  गावातील तरुणांकडून वारंवार होणार विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्यानं महाविद्यालयीन तरुणीनं तणनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
तरुणीच्या आत्महत्येनंतर संतप्त जमावाकडून संशयित आरोपींच्या घरावर हल्ला करण्यात आला. त्यामुळे नणुंद्रे गावात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments