झोडेगाव येथे तलवार घेऊन फिरणाऱ्याला शिल्लेगाव पोलिसांकडून अटक..


 गंगापूर (प्रतिनिधी प्रकाश सातपुते )

गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील  झोडेगाव येथील रुपचंद उत्तम बेडवाल वय 35 वर्ष हा इसम 36 ईंचीची तलवार घेऊन फिरत असल्याची बातमी शिल्लेगाव पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते,पोलीस कर्मचारी मनोज औटे यांनी सदर इसमाला पकडत तलवार ताब्यात घेतले आहे.
                   दरम्यान पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते यांनी  सांगितले की रुपचंद बेडवाल याच्या विरुद्ध शिल्लेगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा  गु.र.नं.268/20 कलम 4,25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Post a comment

0 Comments