दागिने ,पन्नास हजार रुपये घेऊन नवरदेवाच्या परिवाराला चुना लावनारी नवरी पोलिसांच्या ताब्यात.


   पैठण, दि. २७ मंगळवार  : दि २० रोजी  शहरातील लक्ष्मीनगर भागातील राहणाऱ्या एका युवका सोबत  लग्न करून रातोरात दागीने व पन्नास हजार रूपये घेवून पोबारा करणा-या नवरीला  अखेर पैठण पोलिसांनी सेलू मानवत येथून मोठ्या शिताफितीने धरून ताब्यात घेतले असून तिचे दोन साथीदार फरार होण्यास यशस्वी झाले असून पैठण पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

शहरातील लक्ष्मीनगर भागातील कृष्णा कारभारी वंसारे या मुलासोबत मध्यस्थी  व्यक्तीला पाच हजार रुपये देऊन नवरीला ५० हजार रुपये हुंडा देऊन मोठ्या थाटामाटात झालेल्या लग्नाच्या  पहिल्या रात्रीच नवरी अंगावरचे दागिने व रोख ५० हजार रुपये  घेऊन नवरी पळून गेल्याची घटना उघडकीस आली होती .या प्रकरणी पैठण पोलिसात सुनंदाबाई वंसारे हिने तक्रार दाखल केली होती.सदरील घटनेने पैठण शहरात मोठी खळबळ उडाली होती .पैठण पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून सदरील. ठकूबाई नवरीला सेलू मानवत येथून उपपोनि सचिन सानप यांच्यासह कर्मचा-यांनी सदरील तिन आरोपीवर सापळा रचून कारवाईचा बडगा उगारला होता मात्र एकटी नवरीच पोलिसांच्या जाळ्यात अडकलेली समजताच तिचे दोन्ही साथीदारांनी पोलिसांच्या हातावर तुरी देवून पोबारा केला असल्याने पैठण पोलिस त्या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहे .त्यात एक महिला व एक पुरूषांचा सामावेश असून पुजा पवार व कचरू पवार असे या दोन्ही भामट्याचे नावे आहेत 
दरम्यान सदरील टोळी हि लग्नाचे अमीष दाखवून फसवेगिरी करणारी असून खुप ठिकाणी असे प्रकार घडले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे .पुढील तपास पोनि भगिरथ देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  उपपोनि सचिन सानप हे करित आहेत 


⚫     काय  होत प्रकरण  ⚫

पैठण शहरातील लक्ष्मीनगर भागातील सुनंदा कारभारी वंसारे  हि विधवा महिला तिचा मुलगा कृष्णा वंसारे यांच्या सोबत राहत होती सुनंदाबाई हिला मुलाचे लग्न करायचे असल्याने तिने मध्यस्थी पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील एकाच्या मदतीने स्थळ आणले .मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला व लगेच मुलगी उषा पवार हिच्या सोबत कृष्णाचे लग्न मोठ्या थाटात संपन्न झाले .ठरल्या प्रमाणे मुलीची बहिण पुजा पवार व मेहुणा कचरू पवार यांना रोख रक्कम पंन्नास हजार रूपये दिले .त्यानंतर त्यांनी लग्न घरून काढता पाय करत लग्न घर सोडले नंतर नवरा मुलगा व त्याची आई खुप आनंदात होते .सायंकाळी जेवण झाले व रात्री झोपल्या नंतर नवरी उषा पवार हिने तिचा डाव साधत घरातील रोक रक्कम व दागिने घेवून पसार झाली होती .

Post a comment

0 Comments