किसान करनी सेनेच्या वतीने धिक्कार मोर्चाचे आयोजन.


औरंगाबाद( सुनील वैद्य)
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या मुलाला शिवीगाळ केली शेतकऱ्याच्या मुलाने मराठा आरक्षणाविषयी व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून कधी नुकसान भरपाई मिळणार असे विचारले असता महाविकास आघाडीचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरसभेत शिवीगाळ केली त्याच्या निषेधार्थ सिल्लोड येथे करणी सेनेच्या वतीने धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आज किसान करणे सेनेच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेध म्हणून धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे आयोजन आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी सिल्लोड तालुक्यातील( टाकळी जिवरग) येथे भरसभेत मराठा आरक्षण व शेतकऱ्यांविषयी प्रश्न उपस्थित केले असता त्याच वेळी अचानक अब्दुल सत्तार भडकले व त्यांनी जिवरग टाकळी येथील रहिवासी शेतकरी भगवान पाटील जिवलग यांना शिवीगाळ केली . व त्याला घरात घुसून मारण्याची धमकी दिली असा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विविध संघटनांच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आंदोलने करण्यात आली आहेत असेच आंदोलन अब्दुल सत्तार यांच्या होम ग्राउंडवर सिल्लोड येथे किसान करणी सेनेच्या वतीने करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने किसान करणी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments