संपत्तीच्या वादातून पतीकडून पत्नीचा खूनमाहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत केले आरोपीस अटक वैजापूर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

संपत्तीच्या वादातून वेगवेगळे राहणाऱ्या बायकोचा नवरा व मुलगा व अजून दोघांकडून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या वृद्ध स्त्री चा चाकूने भोसकून खून करण्यात आला.यामुळे एकच खळबळ उडाली. आरोपी पतीस वैजापूर पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर माहिती अशी की,केशरबाई कारभारी गवळी वय 65 वर्षे राहणार भिंगी यांचे त्यांचे पती कारभारी गवळी राहणार घायगाव यांच्याशी लग्न झालेले होते.पण त्यांनतर दोघांमध्ये फारसे जमत नसल्याने केशरबाई गवळी या आपल्या मुलीकडे भिंगी येथे राहत होत्या तर कारभारी गवळी हे दुसऱ्या पत्नीसह घायगाव ला राहत होते.केशरबाई व कारभारी यांच्यात 35 ते 40 वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू होता त्यामुळे दिनांक 3 ऑक्टोबर आज तारीख असल्याने ते न्यायालयात हजर  होण्यासाठी येत असताना न्यायालयाच्या समोरच पती व मुलाने चाकूने पाच ते सहा वार करून गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी ताबडतोब धाव घेऊन संबंधित व्यक्तीस अटक केली असून बाकी आरोपी सध्या पसार आहेत तसेच जखमी महिलेस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे दाखल केल्यावर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वैजापूर पोलिसांच्या टीम ने पुरावे गोळा केले असून पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.यावेळी वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक रमेश जाधवर,बोयने मॅडम,राठोड, खोकड,मद्वेवाड सह आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments