राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन...


 
पैठण (प्रतिनिधी विजय खडसन )-
उत्तरप्रदेश येथील हातसर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेतील आरोपींना कडक शासन आणि पिडीत तरुणीला न्याय मिळणे बाबत, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस पार्टीचे पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्फत प्रशासनास निवेदन देण्यात आले.

उत्तरप्रदेश येथील हाथसर येथे १९ वर्षीय मनिषा वाल्मिकी या मुलीवर झालेल्या
सामुहीक अत्याचाराच्या निषेधार्थ संपुर्ण देशभर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
त्या घटनेचा खटला फास्टटॅग कोर्टामध्ये चालवुन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच
उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी व या घटनेमध्ये तात्कालीन तेथील जिल्हाधिकारी यांनी पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना धमकावल्या बद्दल व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी..
यासाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने मा. आ.संजय भाऊ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय तहसीलदार चंद्रकांत शेळके साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते विशाल भैया वाघचौरे, विद्यार्थी आघाडी चे शहराध्यक्ष विष्णुकांत मुंदडा विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष मयुर पाटील लांडगे, ओम तांदळे, अजय बोबडे, अतिष औटे, अश्विन लक्कडहार, सौरभ इंगळे, कलीम पठाण, प्रकाश घोंगडे, कृष्णा गोर्डे, भगवान शिंदे, गोपाल पवार, सोमनाथ चेमटे यांच्यासह आदी विद्यार्थी आघाडी चे पदाधिकारी उपस्थितीत होते.

Post a comment

0 Comments