बंजारा समाजाचे धर्मगुरू थोर तपस्वी बाल ब्रह्मचारी संत परम पूज्य रामराव महाराज (बापू) संस्थान पोहरादेवी यांचे निधन.

 नांदेड, दि. ३१ शनिवार : 
बंजारा समाजाचे धर्मगुरू थोर तपस्वी बाल ब्रह्मचारी संत परम पूज्य रामराव महाराज बापू संस्थान पोहरादेवी यांच्या निधनामुळे समाजाची मोठी हानी झाली.अध्यात्म त्याचबरोबर सामाजिक प्रबोधन माध्यमातून वाडी,तांड्यासह बंजारा, भटक्या जाती समुहात भटक्या समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर रामराव महाराजांनी केलेलीं कार्य अतुलनीय आहे.दिर्घकाळ समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.संत श्री परम पूज्य रामराव महाराज यांचे ८४ व्यावर्षी दिर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले.बापूच्या निधनाने बंजारा समाज पोरखा झाला आहे.
पोहरादेवीचे मुख्य पुजारी म्हणून बापू तिथे राहत होते.
संबंध महाराष्ट्र,यासह आंध्रप्रदेश तेलंगणा कर्नाटक आधी प्रदेशामध्ये बापुची ख्याती होती.
बापूंना बंजारा समाजामध्ये तसेच इतर समाजामध्ये मोठा मान होता.
बंजारा समाजातील कोणतेही महान कार्य करण्याअगोदर नागरिक त्यांचा आशीर्वाद घेऊनच काम करत असत.
एवढेच नाहीतर अनेक राजकीय मंडळीसुद्धा राजकीय कार्य करण्याअगोदर बापू पुढे नतमस्तक होत असत.बापूने आशीर्वाद देताच अनेकांचे राजकीय भलेसुध्दा झाले आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सुध्दा बापू प्रसिद्ध होते.
दरवर्षी पोहरादेवी येथे मोठी यात्रा भरत असते या यात्रेच्या निमित्ताने देशभरातून आलेला बंजारा समाज बापूंच्या आशिर्वाद घेवून शुभकार्याला सुरूवात करत असत.
आज बापूंच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली असून.
बंजारा समाजाचा आधारवड कोसळला आहे.
बापू मुंबई येथील लिलावती रुग्णालयांमध्ये मागील अनेक दिवसांपासून उपचार घेत होते.
ते दिंनाक ३०आँँक्टोबर कोजागिरी पौर्णिमा च्या मध्यरात्री त्यांची प्राण ज्योत मावळली.
महाराजांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला.संपुर्ण बंजारा समाज व भक्तगण शोक सागरात बुडाले.परम पुज्य रामराव महाराज १९४८ साली संत सेवालाल महाराज संस्थान च्या गादीवर बसले होते.
महाराजांचे विचार समाजासाठी चिंरतर प्रेरणादायी ठरणार आहे.

Post a comment

0 Comments