ट्विटरवर 'बाबा का ढाबा' ट्रेंडमध्ये

नवी दिल्ली:  गुरुवारी सकाळपासून ट्विटरवर ‘बाबा का ढाबा’ प्रचंड ट्रेनमध्ये आहे.
दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये हा ढाबा आहे. कांता प्रसाद हे वृद्ध गृहस्थ आपल्या पत्नीसह हा ढाबा चालवतात. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लोक पूर्वीसारखे ढाब्यावर येत नसल्याने कांता प्रसाद यांच्यासमोर दैनंदिन गुजराण कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता.
एका व्यक्तीने कांता प्रसाद यांची विचारपूस केली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. यानंतर एका युजरने हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर करत कांता प्रसाद यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून हा व्हीडिओ प्रचंड चर्चेत आहे. अनेक सेलिब्रिटीजनी हा व्हीडिओ रिट्विट करत कांता प्रसाद यांना मदत करण्याची विनंती केली होती.

Post a comment

0 Comments