दलालाच्या इशाऱ्यावर पिक कर्ज देण्यास टाळाटाळ शेतकऱ्याचे तहसील पुढे आमरण उपोषण....


पैठण (प्रतिनिधी विजय खडसन )--- पैठण तालुक्यातील १५३८ शेतकऱ्यांच्या पिककर्जाच्या फाईल्स वेळेतच दाखल करण्यात आल्या असुन त्या मंजूर करण्यात आल्या आहेत तरीही या शेतकऱ्यांना पिककर्जा पासून वंचित राहावे लागते तर ३३८ शेतकऱ्यांचे पिककर्जाचे धनादेश तयार आहेत मात्र बँकेत पैसा उपलब्ध नसल्यामुळे ते ही आदा करु शकले नाहीत असे असले तरीही पैठण तालुक्यातील गावोगावी मधील  विविध विकास सहकारी संस्था दलालाच्या विळख्यात सापडल्या असुन याचा फटका स्वाभिमानी शेतकऱ्यांना बसला आहे मायगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर दामोदर दसपुते आणि सौ. दसपुते या आणि अनेक शेतकऱ्यांनी आपल्या फाईल्स दलालामार्फत न दिल्याने त्यांच्या फाईल्स परत करण्यात आल्या आहेत.
३० सप्टेंबर २०२० ही शेतकऱ्यांना सी बील दाखल करण्याची शेवटची तारीख घोषीत करण्यात आली होती, मात्र अनेक शेतकऱ्यांनी आपल्या फाइल्स २५ ते २७  तारखेच्या आतच जमा केल्या होत्या तरीही फक्त दलाला मार्फत न आल्याने त्या सर्व फाईल्स परत करण्यात आल्या आहेत. या पिककर्जाच्या प्रकरणात न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करीत, दि, 21ऑक्टोबर रोजी सकाळी 10:00 वाजेपासुन शेतकरी ज्ञानेश्वर दसपुते तहसील कार्यालया पुढे अमरण उपोषणाला बसले होते,
साहाय्य्क निबंधक दिलीप गौंडर व नायब तहसीलदार कमल मनोरे मॅडम यांनी संबंधित बँक अधिकारी, सचिव यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्याचे उपोषण सोडवले....
.................................. सहायक निबंधक - दिलीप गौंडर 👇
 माझ्या कार्यालयात अर्ज दाखल करताच आम्ही माझे सहकारी भारती आणि मी बँकेच्या अधिकारी आणि संबधीताला आहवाल मागून योग्य ती कारवाई करण्यात येईल...

.............................
तहसीलदार - चंद्रकांत शेळके👇
अनेक शेतकऱ्यांनी याबाबतीत तक्रारी दाखल केल्या आहेत  महत्त्वाचे म्हणजे निधी उपलब्ध झाला नाही आणि कोणावर अन्याय झाला असेल तर संबधीताला लेखी कळवून कठोर कारवाई केली जाईल..

Post a comment

0 Comments