श्रीवर्धन नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदी यशवंत चौलकर यांची बिनविरोध निवड


(श्रीवर्धन रामचंद्र घोडमोड)

साधारण १५ महिन्यांपूर्वी श्रीवर्धन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री.नरेंद्र भुसाणे यांनी दीर्घकाळ टाकलेल्या रजेची मुदत संपल्यामुळे व ते नगरपरिषदेत हजर न झाल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आल्यामुळे नवीन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहिर केला होता.पोटनिवडणूकित प्रभारी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांनी शिवसेनेचे नगरसेवक श्री.अनंत गुरव यांचा पराभव करत नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले होते. 
 तथापि पंधरा महिने रिक्त असलेले उपनगराध्यक्ष पदासाठी दिनांक ०७ आक्टोबर रोजी उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन फाॅर्म भरण्यात आले.नगरसेवक श्री.यशवंत चौलकर वगळता कुठल्याही नगरसेवकांनी नामनिर्देशन फाॅर्म न भरल्यामुळे श्री.यशवंत चौलकर यांची बिनविरोध निवड झाली. नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाच्या वेळी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, बबन चाचले,शबिस्ता सरखोत,दिशा नागवेकर हे नगरसेवक उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाच्या वेळी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांनी उपनगराध्यक्ष यशवंत चौलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आपली प्रतिक्रिया देतांना श्री.सातनाक म्हणाले, यशवंत चौलकर हे माझे सहकारी व मित्र आहेत.त्यांना वेळोवेळी लागेल ते सहकार्य आम्ही करु व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
 प्रभाग क्रमांक ०७ ब मधून विजयी झालेले तसेच खासदार श्री.सुनीलजी तटकरे यांचे विश्वासू व निकटवर्तीय असलेले श्री.यशवंत चौलकर हे काही काळ आरोग्य सभापती होते.त्याचप्रमाणे मुळगाव विभाग मच्छीमार सोसायटी चे सचीव असलेले यशवंत चौलकर यांनी आपल्या वाॅर्ड मध्ये सुलभ शौचालय, इंदिरा नगर मधील स्मशानभुमी चे काम केले आहे. तसेच आपण उपनगराध्यक्ष ह्या नात्याने भविष्यात मोहल्ला,मुळगाव कोळीवाडा,गांधी मैदानाचे पिचींग चे काम,नवीन मुळगाव कोळीवाडा रस्त्याचे सिमेंट काॅक्रिटीकरण, मुळगाव जेटीवर लाईटपोल बसवणे इत्यादी कामे आपण करणार आहोत, असे उपनगराध्यक्ष श्री.यशवंत चौलकर यांनी संगितले.

Post a comment

0 Comments