पंचशील फाउंडेशन पुणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण.पुणे, दि. २६ सोमवार : पंचशील फाउंडेशन पुणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे पंचशील फाउंडेशन पुणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेशहरासाठी  आज सहा रुग्णवाहिकांचे आज शरद पवार  यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंचशील फाऊंडेशनचे खा. वंदना चव्हाण उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलतानी पवार असे  म्हणाले की, आज देशभरात कोरोना महामारीचा जो प्रादुर्भाव आहे त्याची टक्केवारी आता कमी होताना दिसतेय. मृत्यूचे प्रमाण कमी झालेले दिसतेय. परंतु, टक्केवारी कमी झाली म्हणून आपण बेफिकीर राहण्याची स्थिती नाही. अमेरिकेसारख्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा होता. त्यानंतर त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे प्रादुर्भाव कमी झाला परंतु, आता पुन्हा गेल्या आठ दिवसांत तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतोय. त्याचबरोबर इटली आणि स्पेन सारख्या देशांमध्येही  कोरोनाची दुसरी लाट आल्याचे बातम्यांमधून कळतेय. त्यामुळे आपल्याला आणखी सजग आणि जागरुक राहण्याची तसेच आणखी साधन सामग्री उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यसरकार, कोरोनायोध्ये कोरोनाशी सातत्याने लढा देत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आठ दिवसातले पाच दिवस विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असतात. तेथील परिस्थिती जाणून घेतात, त्यानुसार कार्यवाही करतात. दुसरे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच अनेकांची नावे याठिकाणी सांगता येतील जे कोविड काळात झोकून देऊन काम करत आहेत.
पंचशील फाउंडेशनच्या वतीने समाजोपयोगी कामे करण्यात येत आहेत. कोरोनाकाळात या संस्थेने आयसीयूचे बेड रुग्णालयांना उपलब्ध करून दिले. आज सहा मतदारसंघासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. आणखी दोन मतदारसंघासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल पवार यांनी संस्थेचे मनपूर्वक आभार मानले.

Post a comment

0 Comments