पैठणच्या नाथविहार परिसराचा विकास करा मुख्याधिकारी यांना निवेदन


पैठण (प्रतिनिधी विजय खडसन:)-

 पैठण स्थित नाथविहार कॉलनी परिसरात नगर परिषद पैठण मार्फत दोन प्रवेशद्वार तयार करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. तथा राजश्री छत्रपती शाहू महाराज याच्या नावाने एक अभ्यासिका व वाचनालय सुरू करावे. लहान मुलांना खेळाचे मैदानाचा विकास करण्या संदर्भात नाथ विहार परिसरा मध्ये विविध विकास कामे व शासकीय योजना राबविण्यात यावे असे ॲड.सुभाष खडसन यांनी पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सोमनाथ जाधव यांना निवेदन दिले आहे. वेळोवेळी निवेदन देऊन मुख्याधिकारी यांचे वरील मागणीवर लक्ष केंद्रित करून सुध्दा अद्याप पर्यंत काहीही  कार्यवाही झाली नाही. त्यासाठी त्वरित वरील मागणी पूर्ण व्हावी असे निवेदन अँड.सुभाष खडसन यांनी न.प. मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांना निवेदन दिले.

Post a comment

0 Comments