हाथरस येथील मुलीवर झालेल्या अन्याया विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पैठण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनपैैैठण (प्रतिनिधी विजय खडसन) :-  

उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील मुलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात व अन्य विविध राज्यातील झालेल्या बलात्काराच्या विरोधात
बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्ररवार रोजी  तहसील कार्यालयासमोर धरणा आंदोलन करून योगी सरकार व   केंद्रसरकारचा निषेध करण्यात आला यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून  नायब  तहसीलदार पंडूरे  यांना निवेदन देण्यात आले. 

उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे अनुसुचित जातिच्या मुलीवर येथील गुंडगिरी करणाऱ्या गुंडांनी सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.तर बलरामपुर मध्ये अनुसुचित जातिच्या मुलीवर बलात्कार करून हत्या,भदोहीमध्ये १४ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार करुन हत्या,आजमगढ मध्ये८वर्षीय चिमुकली बालिकेवर बलात्कार,अलीगढमध्ये ३ वर्षीय बालिकेवर बलात्कार, राजस्थान येथील सीकर,बारा,जयपुर , अजमेर अशा विविध ठिकाणी लहान बालिकेवर व महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली.अशा आरोपींना फाशीची शिक्षा द्या, या प्रकरणी हस्तक्षेप केलेल्या पोलीस अधिकार्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, लोकशाही संपुष्टात आणणारी ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे या अन्यायाच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आज पैठण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी भारत मक्ती मोर्चा , रिपाई ए ,डिपी आय ,बसपा ,बहुजन मक्ती पार्टी ,भारतीय विद्यार्थी मोर्चा ,भारती युवा मोर्चा ,आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

            

 बहुजन क्रांती मोर्चाच्या एक दिवसीय धरणे प्रदर्शनाला पैठण शिवसेनेच्या वतीने माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास बापू भुमरे यांनी  जाहीर पाठिंबा देऊन ना.मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे लक्षवेधी होण्यासाठी हा प्रश्न मांडणार  आहे. असे यावेळी सांगितले

Post a comment

0 Comments