नवरात्रीच्या सहाव्या माळीच्या रंगाचं महत्व.

औरंगाबाद (योगिता बनसोडे):- परमेश्वराच्या नैसर्गिक क्रोधातून उत्पन्न झालेले हे देवी दुर्गेचे सहावे रूप म्हणजे कात्यायिनी. लाल रंगाशी जोडलेली असली तरीही या देवीचा आवडता रंग हिरवा समजण्यात येतो. षष्ठीच्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचा वध या देवीने केला होता त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही नाव आहे. 

कालिका पुराणात ओडिसामध्ये कात्यायनी आणि भगवान जगन्नाथ यांचे स्थान सांगण्यात आले आहे. आज्ञा चक्र या दिवशी स्थित होत असून योगसाधनेत याचे महत्त्व आहे. अविवाहित मुलींसाठी ही देवी एक वरदान आहे. वैवाहिक जीवनात सुखशांती, समाधान मिळवून देण्यासाठी या देवीची महिला पूजाअर्चा करतात. त्यामुळेच हिरव्या रंगालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. हिरवा रंग हा वैवाहिक जीवनाशी जास्त संबंधित मानला जातो. 

Post a comment

0 Comments