कंपन्या जळुन खाक होतायेत,मग राजकीय मंडळींच्या भेटीमागे दडलंय काय?महेश पासलकर यांचा संवाल


निलेश जांबले
 दौंड-पुणे.
कुरकुभं औद्योगिक वसाहतीमधील अल्कली अमाईन्स कंपनी मध्ये १४ आॅगस्ट २०१९ रोजी रात्री भीषण आग लागली होती,याच घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे... स्थानिकांनी व आसपासच्या गावातील नागरिकांनी पंधरा ते वीस किलोमीटर अंतरापर्यत पळ काढला होता... याचीच दखल घेत  लगेचच घटनास्थळी दौंड चे आमदार राहुल कुल  यांनी भेट देऊन चौकशीची  मागणी केली होती.
तदनंतर खासदार सुप्रिया सुळे, तत्कालीन पर्यावरण व कामगार मंत्री बाळा भेगडे, राहुल कुल, रमेश थोरात,सह तालुक्यातील अन्य राजकीय मंडळींच्या भेटी झाल्या मात्र या भेटीमागे नेमकं दडलंय काय असा सवाल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी उपस्थित केला आहे...
तदनंतर जिल्हाधिकारी यांच्या समवेत अनेक बैठका झाल्या प्रशासनास सुचना व कारवाईचे आदेश दिले मात्र यास औद्योगिक सुरक्षा विभाग  व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकार्यांनी केराची टोपली दाखवली आहे...
तर काल दिनांक१ आॅक्टोबर रोजी कुरकुभ औद्योगिक वसाहतीमध्ये शिवशक्ती आॅक्सिलेट या कंपनीने नियम धाब्यावर बसवून उत्पादन सुरु ठेवत नियमबाह्य केमीकल साठा साठवणुक  केली असुन यास औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी अखिल घोगरे यांच्याच वरदहस्ताने हे कृत्य सुरू होतं नियम बाह्य काम करणाऱ्या कंपनीवर एवढी दिवस काहीच कारवाई का नाही,असाही सवाल अनेकांना पडत आहे. यांस सर्वस्वी जबाबदार औद्योगिक सुरक्षा विभागच असल्याचे सिध्द होते आहे.

अशा वारंवार होणाऱ्या घटनांना कंपनी प्रशासनाबरोबर औद्योगिक सुरक्षा विभागही तितकाच जबाबदार आहेत.त्यामुळे औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे विरोधात संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले...

Post a comment

0 Comments