'भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे'.

मुंबई : परतीच्या पावसामुळे सर्वच पिकांचं नुकसान झालं होतं. पण आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. भाजीपाला बाजारात आवक वाढल्यानं सर्वसामान्यांनी आता सुटकेचा श्वास घेतला आहे. घाऊक बाजारात आज जवळपास ६०० गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे.

भाज्यांचे दर हे पुन्हा स्थिर झाले आहेत. पुणे, नाशिक, नगर, कर्नाटक, गुजरात, जळगाव, लातूर या सर्व ठिकाणांहून आज गाड्यांची आवक मोठया प्रमाणावर झाली आहे अशी माहिती भाजीपाला मार्केटचे व्यपारी श्यामराव मोहिते पाटील यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments