मॅच फिनिशर धोनीचा फॉर्म हरवला?

नवी दिल्ली : मॅच फिनीशर महेंद्रसिंह धोनी…चौके, छक्के लगावून मॅच जिंकवणारा धोनी…मात्र याच मॅच फिनीशरचा फॉम सध्या कुठे हरवलाय, असा प्रश्न करोडो क्रिकेटप्रेमींना पडला आहे.

याच महेंद्रसिंह धोनीनं २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला २८ वर्षानंतर विश्वविजेता बनवलं होतं. धोनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं होतं. मात्र याच धोनीच्या चेन्नई टीमला टी-२० च्या सीजन-१३ मध्ये काही विशेष कमाल करता आलेली नाही.
हैद्राबादविरोधातील मॅचमध्ये धोनी नाबाद राहिला. मात्र चेन्नईची टीम ७ धावांनी पराभूत झाली. सीजन-१३ मध्ये हे दुसऱ्यांदा घडलं की महेंद्र सिंह धोनी नाबाद, मात्र टीम पराभूत झाली आहे. तर आतापर्यंत सर्व लीगमध्ये धोनी सहा वेळा नॉटआऊट राहिला. मात्र टीमला विजय काही मिळवता आला नाही.Post a comment

0 Comments