गरीब कुटुंबांना मोफत राशन किट चे वाटप एल अँड टी फायनान्स व दिलासा चा उपक्रम


गंगापूर( प्रतिनिधी प्रकाश सातपुते )
गंगापुर तालुक्यातील विविध गावात गोरगरिबांना व गरजू लोकांना मोफत धान्य वाटप
एल अँड टी फायनॅन्सीयल कंपनी व दिलासा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या जलवैभव प्रकल्प अंतर्गत गंगापूर येथील 20 गावांमध्ये पाणलोट कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांनच्या हितासाठी विविध उपक्रम सुरू आहेत या उपक्रम अंतर्गत सुरू असलेल्या कामांसोबत गावात हा उपक्रम राबविण्यात आला  . या वर्षी कोरोनाच्या महाभयंकर महामारीमुळे ग्रामीण भागातील गरजू व इतर लोकांना आपल्या सामाजिक दायिताव निधी अंतर्गत मदत करावी या उदेशाने मेहबूबखेडा, आगाठण  येथे गरजू व इतर कुटुंबाना राशन किट देऊन मदत करण्यात आली, या राशन किट मध्ये तेल, गेहू , तांदूळ  दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असतात आशा अन्नधान्य पुरविण्यात आल्या आहेत या उपक्रमासाठी चे . दिनेश बाजाड  दिलासा संस्थेकडून वैशाली खाडिलकर, मोहसीन अहमद, प्रवीण निकम , अशोक सातपुते तसेच पंचायत समिती सभापती सुनील पा केरे राष्ट्रवादीचे उप तालुका प्रमुख  फारुख चौधरी उपस्थीत होते तसेच गावातील माजी सरपंच कचरु  आहेर पोलीस पाटील चंद्रभान जाधव  नंदकुमार गवळी  जलवैभव टिमचे कृषीदूत राजेंद्र गवळी मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments