जाणून घेऊया दुसऱ्या माळीच्या रंगाचं महत्व.

औरंगाबाद (योगिता बनसोडे) :-  शारदीय नवरात्रौत्सव ची आज दुसरी माळ. 
देवीचे आज ब्रह्मचारिणी रूप. या रूपात आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधत देवी आहे.देवी तिच्या मनमोहक रूपाने सूर्याला प्रकाशमान करू शकते असे म्हणतात.
ग्रहांनुसर नवरात्रीचे रंग ठरवले आहेत. आज रविवार म्हणून आजचा रंग सूर्याचा अर्थातच केशरी रंग.


नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रम्हचारिणी देवीचा मानण्यात येतो. दुसऱ्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. या दिवशी देवीची भक्ती आणि उपासना करण्यात येते. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी. तपस्या आचरणात आणणारी ही देवी असल्याने या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपस्या करावी लागते. या देवीच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असते असे सांगण्यात येते. कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते असं म्हटलं जातं.

 या देवीचा आवडता रंग नारिंगी असून तिला जास्वंदीचे फूल प्रिय असल्याचे समजण्यात येते. त्यामुळे या दिवशी नारिंगी रंगाच्या कपड्यांचे परिधान करण्यात येते.  या दुसऱ्या दिवशी तिची पूजाअर्चा करून तिला तिचे भक्त प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. 
नवरात्रीत देवीला प्रत्येक दिवशी या रंगानुसार साडी नेसवली जाते आणि स्त्रिया देखील त्या रंगाचे कपडे परिधान करतात.


Post a comment

0 Comments