अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. अमित ठाकरे यांना ताप आल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत

अमित ठाकरे यांना दोन दिवसांपासून ताप येत आहे. खबरदारी म्हणून ते रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यांची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. याशिवाय त्यांची मलेरिया टेस्ट करण्यात आली, ती सुद्धा निगेटिव्ह आली.
अमित ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून ग्राऊंडवर उतरुन अॅक्टिव्हपणे कामं करत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत, डॉक्टरांचे प्रश्न अशा विविध कामाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं

Post a comment

0 Comments