कोव्हिड रुग्णांच्या मदतीसाठी रक्तदान शिबीराचे आयोजन ,एमआयडीसी पोलीस स्टेशनचा उपक्रम...
 पैठण प्रतिनिधी विजय खडसन:---

पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या वतीने जातीय सलोखा अभियाना अंतर्गत कोरोना आजाराच्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय रूग्णालय(घाटी) औरंगाबाद व एमआयडीसी पैठण पोलिस ठाणे यांच्या वतीने सोमवार  रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील सह पोलीस अधिकारी व कर्मचारी,नागरीक उपस्थित होते.
      यावेळी एमआयडीसी पैठण सह पिंपळवाडी परीसरातील नागरीकांनी या रक्तदान शिबीरास मोठ्या प्रमाणात रक्तदान करून सदर अभियानास चांगला प्रतिसाद दिला यावेळी विभागीय रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी औरंगाबाद डॉ प्रेरणा गायकवाड, रक्त संक्रमण अधिकारी डॉ स्नेहा सूर्यवंशी,डॉ प्रतीक्षा जक्ते, जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे,नागनाथ पाध्ये ,तंत्रज्ञ मझहर शेख, बबन वाघ,शैलेंद्र शेळके, संभाजीराजे शिंदे सह पोलिस जमादार तुकाराम मारकळ, बाळासाहेब चव्हाण,जाकेर शेख,संपत दळवी,शरद पवार, राहूल बचके, खंडू मंचरे, रामेश्वर तळपे , सह आदी उपस्थित होते

Post a comment

0 Comments