चाकूच्या धाकावर मुंबईत विवाहितेवर बलात्कार

मुंबई : उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथल्या बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना राज्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी दोन आरोपींना अटकही केली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. 

दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित महिलेची ओळख शेजारी राहणाऱ्या फय्याज शेखसोबत झाली होती. जून २०१८ मध्ये फय्याजने महिलेला घरी बोलवलं होतं आणि चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यावेळी आरोपी फय्याजने महिलेचा व्हिडिओ तयार केला आणि तो मित्र सादिक पटेलच्या मोबाईलवर शेअर केला.


Post a comment

0 Comments