राहुल गांधींनी कमलनाथांना जाहीरपणे फटकारले.

नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील भाजप आमदार इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारे काँग्रेस नेते कमलनाथ यांना राहुल गांधी यांनी मंगळवारी जाहीरपणे फटकारले. कमलनाथजी माझ्या पक्षाचे असले तरी त्यांनी वापरलेली भाषा मला वैयक्तिकरित्या बिलकूल आवडलेली नाही. मी त्याचे कदापि समर्थन करणार नाही, मग ती व्यक्ती कोणीही असो. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

मात्र, एरवीदेखील आपल्या देशात महिलांना देण्यात येणाऱ्या एकंदरीत वागणुकीत खूपच सुधारणा होण्याची गरज आहे. मग ती कायदा-सुव्यवस्था असो किंवा त्यांचा आदर करणे असो. आपल्या देशातील महिलांनी उद्योग, राजकारण आणि इतर क्षेत्रांमध्ये स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे. त्या आपल्या देशाचा अभिमान आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments