भाजपच्या महिला आघाडीचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन


पैठण (प्रतिनिधी विजय खडसन) :--  

महाराष्ट्रात महिला सुरक्षितेबाबात सोप करण्याची मागणी आज पैठण भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने एका निवेदनात केली आहे 
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस अश्विनीताई लखमले पैठण तालुका महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती सुलोचना ताई यांच्या आज तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन दिले.महाराष्ट्रात कोरोना कोवीड सेंटर वर सुद्धा महिला सुरक्षित नाहीत, बलात्कार, विनयभंग, खुन, अशा अनेक घटना राज्यात घडत असतांना राज्य सरकार मूर्ख आहे यापूर्वी ही मा.श्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले होते मात्र त्यांनी योग्य ती दखल न घेतल्याने अशा दुर्घटना सातत्याने घडत आहेत असे ही या निवेदनात म्हटले आहे
यावेळी मंगल भवर, नगरसेविका सौ.अशाताई आंधळे,नम्रता पटेल ,सौ. सविता माने या उपस्थित होत्या
या वेळी श्रीमती सुलोचना साळुंके सौ नम्रता पटेल उपस्थित होत्या.
तर आपण तात्काळ हा विषय शासनाच्या वरिष्ठांना कळवू असे अश्वासन पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी यावेळी दिले
निसर्ग कवी असाराम दहिहंडे यांनी आपला पाठिंबा दिला..
.

Post a comment

0 Comments