महिला भाज्या आणायला लोकलमधून जाणार नाहीत; अस्लम शेख यांनी रेल्वेला खडसावलं

मुंबई: मुंबईत पहिल्यांदाच लोकल धावणार नाही. किंवा नवीन स्थानकही नाहीत. तुमच्याकडे लोकल आहेत. प्लॅटफॉर्म आहेत आणि ट्रेन मॅनेज करणंही तुमच्या हाती आहे. मग तुम्हाला नेमकं हवं आहे काय? ट्रेनचं घोडं का अडवून ठेवलं आहे? महिला भाज्या खरेदी करण्यासाठी लोकलमधून जाणार नाहीत?, मग एवढी अडवणूक का? अशा शब्दांत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी रेल्वेला खडसावलं.

रेल्वेकडून महिलांना लोकलमध्ये प्रवेश देण्यावरून सुरू असलेल्या टोलवाटोलवीचा अस्लम शेख यांनी समाचार घेतला. मुंबईवरून मजुरांना घरी पाठवत असतानाही रेल्वेने अशीच भूमिका घेतली होती. आताही तशीच भूमिका घेत आहे. रेल्वेतून पहिल्यांदाच प्रवास होत आहेत का? महिलांना रेल्वेतून प्रवासासाठी परवानगी द्यावी म्हणून राज्य सरकारने रेल्वेसोबत बैठका घेतल्या. त्यावर किती महिला लोकलमधून प्रवास करतील याची माहिती देण्यास रेल्वेने सांगितलं. ही माहिती कुणी कुणाला द्यायची?, असा सवाल अस्लम शेख यांनी केला. 

Post a comment

0 Comments