कोंढवड शाळेची दुर्वा म्हसे हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


राहुरी : फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राहुरी तालुक्यातील कोंढवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी दुर्वा रत्नकांत म्हसे हिने २३० गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.या शाळेचे ९ विद्यार्थी या परीक्षेत पात्र झाले आहेत.
     दुर्वा म्हसे हिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचा स्वामी विवेकानंद नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी माजी सरपंच जगन्नाथ म्हसे,कोंढवड सोसायटीचे माजी चेअरमन जगन्नाथ भाऊसाहेब म्हसे, दिलीप म्हसे, केंद्र प्रमुख रविंद्र थोरात,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी औटी,पोपट म्हसे, पंढरीनाथ म्हसे, रत्नकांत म्हसे,मथुराबाई म्हसे,सिंधुबाई म्हसे,आदी उपस्थित होते.परिक्षेत पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
       वर्गशिक्षक विजय कदम सर,शिवाजी कुलट सर,भागवत पुंड सर, बाळकृष्ण देवरे सर,दिलीप वर्पे सर,बाळु आमले सर, मुख्यध्यापिका हिरा चंदणे मॅडम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.शाळेच्या या यशाबद्दल पुर्वीचे गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, सध्याचे गटशिक्षणाधिकारी सुनिल सुर्यवंशी,विस्तार अधिकारी अर्जुन गारुडकर यांनी अभिनंदन केले आहे.या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a comment

0 Comments