किरायाच्या खोलीत ठेवून जिवे मारण्याची धमकी देत २४ दिवस केला अत्याचार

बीड:- पीडित महिला बीड तालुक्यातील एका गावची रहिवासी आहे. तिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिला तीन वर्षांची एक मुलगी आहे. कौटुंबिक कलहातून पतीने सासरी नांदवण्यास नकार दिल्याने ती दोन वर्षांपासून माहेरी राहत आहे. दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी ‘तुला तुझ्या पतीकडे सोडतो’ असा बहाणा करून ऊसतोड मुकादम असलेल्या राजेश छगन राठोड (रा. अंथरवणपिंप्री, ता. बीड) हा महिलेसह तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह घेऊन बीडला आला. बसस्थानकात रात्री मुंबईला जाण्यासाठी बस नसल्याने आजच्या दिवस किरायाच्या खोलीत राहू, असे सांगून तो तिला आदर्शनगरात घेऊन आला. किरायाच्या खोलीत त्याने त्या रात्री तिच्यावर बळजबरी केली. तिने विरोध केल्यावर तुझ्यासह तुझ्या मुलीला जिवे मारीन, अशी धमकी दिली. १ ते २४ ऑक्टोबरपर्यंत त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मंगळवारी पीडितेने शिवाजीनगर ठाणे गाठून तक्रार दिली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात राजेश राठोडवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला.

Post a comment

0 Comments