'माफीचा साक्षीदार’ काळाच्या पडद्याआड

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर  यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज (८ ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता ठाण्यातील राहत्या घरी निधन झाले. 
अविनाश खर्शीकर जानेवारीपासून आजारी होते. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दीर्घकाळ आजारी असलेल्या अविनाश यांनी वयाच्या 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी श्रद्धांजली देत ही बातमी शेअर केली आहे.

Post a comment

0 Comments