बस आणि इनोव्हा कारची भीषण धडक, चौघेजण जागीच ठार, ३ गंभीर जखमी

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. बस आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. भर रस्त्यात हा अपघात झाल्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कळंबे तर्फ कळे इथं हा भीषण अपघात झाला आहे. बस आणि भरधाव इनोव्हा कार एकमेकांसमोर धडकली. यामध्ये कार पुढच्या बाजूने पूर्णपणे बसच्या इंजिनमध्ये शिरल्याचं सांगण्यात येत आहे.

Post a comment

0 Comments