जांभाळा/वरझडी शिवारात भीषण अपघात दोन जागीच ठार.गगापुर प्रतिनिधी (प्रकाश सातपुते) 

एका जखमीस शिल्लेगाव पोलिसांनी घाटित हलवले....

गंगापूर तालुक्यातील  शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरझडी/जांभाळा गावाच्या शिवारातील धुळे सोलापूर राज्य महामार्गावर दुपारच्या सुमारास कंटेनर बल्कर व टाटा पिकअप वाहन याचा अपघात झाल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांना समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे, बिट अंमलदार कैलास राठोड,पोलीस शिपाई संतोष गिरी, अनिल दाभाडे,यांनी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन रहदारी सुरळीत केली.                
                              दरम्यान हा अपघात खूपच भीषण होता त्यामुळे टाटा पिकअप मधील चालक संदीप शन्तिलाल अजमेरा वय
( 45वर्ष ) व बब्बू शेरू शेख़   
(वय 23 वर्षे)  हे दोन व्यक्ती जागीच ठार  झाले व एक व्यक्ती जखमी झाल्याने त्यास पोलिसांनी शासकीय रुगणालय  घाटी दवाखाना औरंगाबाद पाठवले.

Post a comment

0 Comments