उमरी तालुक्यात परती च्या पाऊसाने सोयाबीन कापसाची वाट लागली ; शेतकऱ्याच्या डोळ्यात आले अश्रू धारा

नांदेड जिल्हा:प्रतिनिधी  बळवंत  थेटे.


उमरी तालुक्यात परतीच्या पाऊसाने सतत हजेरी लावल्याने हाती आलेले पिकांचे अतोनाथ नुकसान झाले असुन सोयाबीन , कापुस,हळद अन्य  या पिकांची तर वाट लागली आहे . पेरणी खत - बि बियाना खर्च तरी निघेल की नाही अशी परिस्थिती निर्माण आता  अतिवृष्टीमुळे  झाली असल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू च्या पहाट वाहताना  येत आहे .


उमरी तालुक्यात कापूस , सोयाबीन , मुग , उडीत , तुर , ज्वारी, हळद या पिकांवर शेतकरी अधिक भरदिला होता पेरणीच्या सुरुवाती पिका योग्य पाऊस पडला. शेतकऱ्याला ही वाटले यंदा सुगी चांगली पिकेल अशा वाटली पण  झाले उलटे निसर्ग कोपला आणी पाऊसाची अतिवृष्टी सुरु झाली.  पिके हिरवी असलेले पिवळे पडू लागली. कापसाचे पाने ही लाल होत गेली अनेक औषधी फवारणी खर्च झाले पण कोणताच पिकांवर फरक पडला नाही.


गतवर्षीचा दुष्काळ,बॅक कर्ज, सावकाराचे कर्ज , यात मुलिचे लग्न , कुंटुबाची परिस्थिती, मुलाचे शिक्षण , कोरोना महामारी ,लॉक डाऊन चा दणका अशा अनेक समस्याना शेतकरी ग्रासला असून  जगावे तरी कसे ? असे चित्र शेतकऱ्या समोर मोठे आहावान उभे राहीले आहे . डोळे पाणाऊन भरून आले तरीही हुंदके देत स्वतःला सावरत नशीबाला दोष शेतकरी  देत राहीला . कसे बसे अर्ध पिक वाया गेल तरी ही अर्ध तरी पदरी पडेल असे वाटू शेतक-यांला लागले मात्र पाऊसाने तर  काय पिछ्या सोडलाच नाहीं म्हणून मुग, उडीदा च्या शेंगा कोमेजून गेल्या बुरसा चढला सडून गेले  दाळी पुरते सुद्धा पिकले नाही . सोयाबीन हाती आले होते पण परतीच्या सतत  पाऊसाने झोडपून काढल्या मुळे सोयाबीनला मोडे फुटून  शेतात वाया गेली आणी २५ % टक्केच पदरी पडले तर अनेकानी शेतात सोयाबीनचे ढग लावून ठेवले ते ही ओल्या अवस्थेत आहेत . ते ही पांढरी बुरशी चढून कोमेजुन जात आहेत . ज्वारी पाऊसाच्या माराने काळी काजळी धरली आहे . कापूस हे पांढरे सोने आता पिवळे पडले आहे . कापसाचे बोंडे किडेले झाले आहेत बोंडे गळून पडत आहे हाती आलेल्या कुठे तरी फुटलेला कापूस पाऊसामुळे वेचता येईना एवढे जमिनीमध्ये  पाऊसाने बिळबिळ झाली आहे .  एवढे संकट शेतकऱ्याच्या  पदरी पडले .आता शेतक-यांना स्वतांचे  घर संसार चालवणे कठीन होत आहे. म्हणून शेतकरी ७ / १२ गहाण ठेवून बँकेत कर्ज घेण्यासाठी बॅकेचा उबंरवठा जिझत  दिवसराञ लाईनीत बसुन राहूण हातात पैसे केंव्हा पडेल अशा बाळगत आहे तरी ही हेच  पिक कर्ज वेळेवर मिळत नाही . प्रत्येक  बँकेत दलालाचा सुळसुळाट आहे चेरीमेरी दिले तर तेव्हा कुठे फाईल पुढे सरकते. पिक कर्जाचे कामे दलाला मार्फत हपत्याच कामे होतात . शेतकरी थेट बँकेत गेले तर त्याना कोणी व्यस्थीत बोलत नाही त्यांची कर्ज फाईल  तीन ते चार महिने धुळखात राहते . बिचारा शेतकरी बॅकेत चकरा मारून परेशान होतो . यावर अंकुश कोणाचे ही राहीले नाही. सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी चे शेतक-याच्या प्रश्न कडे दुर्लक्ष दिसते.प्रशासन सुस्त आहे.शेतक-यांचा धनी कोणी उरला नाही.शेतक-यांच्या काही शेतात पिकल नाही.शेतक-यांच्या डोक्यावर  कर्जाचे डोगंर घेवुन शेतकरी  फिरतो.घरात लग्नाला आलेली मुलगी घरातच आहे. परत कशी करावी मनस्तापात असलेल्या शेतकऱ्याना पिक कर्ज ही वेळेवर मिळत नाही .. मग शेतकरी आत्महत्या करणार नाही तर मग काय करेल . शेतकरी आत्महत्या करू नये असे सांगणारे तरी शेतकऱ्याच्या व्यथा समजून घ्यावे. पिक कर्ज देवुन दिलासा द्यावे  सरकार तरी पिकाची नुकसान भरपाई आर्थिक मदत तातडीने द्यावे . पिक विम्मा शेतक ऱ्याना मिळून द्यावे  अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे.एकीकडे काॅग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा  व सेना आपले पक्ष वाढेल आणी शेतक-यांकडे दुर्लक्ष करत यातुन सत्ता हातात कसे मिळत हेच पहात आहे......

Post a comment

0 Comments