संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे यंदाचे गाळप हंगाम लवकर सुरु करणार - घायाळ
पैठण ( विजय खडसन )

पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे यंदाचे गाळप हंगाम लवकर सुरू करणार असल्याची माहिती  कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांनी दिली. तालुक्यात झालेल्या जोरदार वादळी  पावसाने 9 हजार हेक्टर च्या वर लागवड झालेल्या ऊसाच्या क्षेत्रा पैकी जवळपास 3 हजार हेक्टर च्या जवळपास ऊस हा जमीनदोस्त झाला असुन हा ऊस कारखाना सुरू होताच प्राधान्याने पहिल्या टप्प्यात तोडणी करुन नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांनी तालुक्यातील पावसाने नुकसान झालेल्या ऊसाच्या क्षेत्राची पाहणी केल्या नंतर सांगितले.

तालुक्यात सतत होणाऱ्या जोरदार पाऊसाने शेतकऱ्याच्या तोंडातील घास हा पावसाने हिरावून घेतला आहे. अशी परिस्थिती असतांना अद्याप ही शासनाने कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना जाहीर केली नाही. शेतकरी निराश झालेला असतांना तालुक्यातील नगदी पिक म्हणून ऊसा कडे शेतकऱ्यांचा कल असल्याने तालुक्यात यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले मात्र पावसाने ऊस हा खाली पडला असुन या ऊसाची तोडणी व पुढील महिना भरात उंदीराच्या उपद्रवाने ऊसाची नासाडी होणार असल्याने या पडलेल्या उसाच्या पिकाची पाहणी नवगाव, आपेगाव, विहामांडवा, दादेगाव, आज कारखान्याचार चेअरमन सचिन घायाळ, संचालक गोपीनाथ गोर्डे,आबासाहेब मोरे सह शेतकरी नवनाथ नवथर,आदी ने केली असता ऊसाचे जवळपास तीन हजार हेक्टर च्या वर ऊस नुकसान झाले असून हा ऊस कारखाने सुरू झाल्यावर पहिल्या टप्प्यात तोडणी केली तरच शेतकऱ्यांना फायदा होणार असे या पाहणी आढळून आले असल्याने पहिल्याच टप्प्यात प्राधान्याने पडलेले ऊस घेऊन जाणार असल्याचे चेअरमन घायाळ यांनी सांगितले. 
 
कोटी ची उलाढाल होणार
कारखान्याची गाळप क्षमता साडेबाराशे असुन साडेतीन  लाख टनाच्या वर गाळप अपेक्षित असल्याने हा कारखाना सुरू होत असल्याने पैठण तालुक्यात शंभर कोटीची  उलाढाल यंदा होणार आहे, सध्या तालुक्यात नऊ  हजार हेक्टर वरील ऊस असुन यातील तीन हजार हेक्टर च्या जवळपास ऊस पावसाने खाली पडला आहे, याचा  प्रश्न गंभीर असल्याचे कारखाच्या पदधिकारी यांचा ऊस पाहणी द्वारा शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे.

--

Post a comment

0 Comments