कन्नड गेवराई शेमी मुक्कामी बस जनतेच्या सेवेत सुरू

सिल्लोड दि. २६ रविवार :गेवराई शेमी कन्नड मुक्कामी बससेवा सुरू करण्यात यावे अशी मागणी जन मंगल संघाच्या वतीने कन्नड परिवहन महामंडळाचे आगरप्रमुख यांना निवेदनाद्वारे करण्यात आले होती.कोरोनाच्या प्रार्दुभाव असल्यामुळे मार्च महिन्यापासून बस सेवा बंद करण्यात आली होती. आता जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच कन्नड गेवराई मुक्कामी बस सेवा बंद असल्यामुळे नागरिकांची प्रचंड हेळसांड होत होती. याची दखल घेत जन मंगल संघाच्या वतीने निवेदन देऊन संस्थापक राहुलकुमार ताठे व पदाधिकारी यांनी बससेवा पूर्ववत करावी अशी मागणी केली होती. नुकतेच जन मंगल संघ यांना कन्नड आगाराच्या वतीने बस सेवा सुरू करीत असल्याचे कळविले आहे. कन्नड तालुक्यात गेवराई शेमी येथील नागरिकांचे नातेसंबंध असल्यामुळे दिवाळी, भाऊबीज सणाला या बसला मोठा प्रतिसाद असतो. बस सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Post a comment

0 Comments