राजकारणातही 'शिंदेशाही बाणा', गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर?

मुंबई : सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे राजकीय आखाड्यात उतरण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीच्या तिकीटावर आनंद शिंदे विधानपरिषद निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे विधीमंडळातही आता ‘खणखणीत’ शिंदेशाही आवाज घुमण्याची शक्यता आहे. 

आनंद शिंदे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचे याआधीही बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आनंद शिंदेंची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर लांबलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद निवडणुकीतून शिंदे राजकीय आखाड्यात उतरण्याचे संकेत मिळत आहेत.

Post a comment

0 Comments