महाड औद्योगिक वसाहतील ॲस्टेक कंपनीचे रसायन रस्त्यावर सांडले धोकादायक परीस्थिती
    प्रदुषण नियंत्रण मंडळा कडुन होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

महाड दि. ३१ शनिवार :   किटक नाशक बनविणाऱ्या ॲस्टेक लाईफ सायन्स या कंपनीचे ॲसिड दोन दिवसापुर्वी रस्त्यावर सांडल्याने धोकादायक परीस्थिती निर्माण झाली होती.  बिरवाडी टाकी कोंड पासुन कंपनी पर्यंत सुमारे दोन किलो मिटर अंतरावर हा रसायनाचा सडा पडला होता.  प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याची पहाणी केली नमुने घेतले.  कंपनी प्रशासनाने हे धोकादायक नसल्याचे सांगितले असले तरी सदर रसायन लिटमस पेपर टेस्टमध्ये ॲसिड असल्याचे निदर्शनास आले आहे.  महाड औद्योगिक वसाहतील वाढते प्रदुषण आणि कमी प्रमाणात होणाऱ्या कारवाया यामुळे आता ॲस्टेक कंपनीच्या या प्रकरणात प्रदुषण नियत्रण मंडळ कोणीती कारवार्ई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a comment

0 Comments