IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचं कोव्हिडमुळे निधन

२०१५ सालच्या IAS बॅचचे अधिकारी सुधाकर शिंदे यांचं कोव्हिड १९ मुळे पुण्यात निधन झालं. मूळ परभणीचे असणारे शिंदे त्रिपुराच्या अर्थमंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते.
दोन आठवड्यांपूर्वीच शिंदे सुटीसाठी कुटुंबासह गावी आले होते. इथेच त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आणि त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना सुरुवातीला नांदेडमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तिथून औरंगाबादला हलवण्यात आलं. पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं.
दोन आठवड्यांपूर्वीच शिंदे सुटीसाठी कुटुंबासह गावी आले होते. इथेच त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आणि त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना सुरुवातीला नांदेडमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तिथून औरंगाबादला हलवण्यात आलं. पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं.तिथे उपचारांदरम्यान सुधाकर शिंदे यांचा मृत्यू झाला.

Post a comment

0 Comments