MBA तरुण चेन स्नॅचर बनला, ५६ ग्रॅम सोनं जप्त

कोल्हापूर : इचलकरंजीत धूम स्टाईलने  महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणार्‍या उच्च शिक्षित चेन स्नॅचरला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. 


एमबीएचं शिक्षण घेतलेला हा तरुण लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्याने चेन स्नॅचिंग करु लागला. आकाश संजय हिंगे (वय २२) असे या चेन स्नॅचर तरुणाचं नाव आहे. त्याने तीन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ५६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अ‍ॅक्टिव्हा मोपेड, मोबाईल असा एकूण ३ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे.

लॉकडाऊन काळात महिलांच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने लांबविण्याचे प्रकारात वाढ झाल्याची माहिती होती. या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची मदत केली. त्यामधून पोलिसांना या चेन स्नॅचरच्या वाहनाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत संशयावरुन आकाश हिंगेला ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाक्या दाखवताच हिंगेने चोरी केल्याची कबुली दिली.

Post a comment

0 Comments