MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण : चंद्रकांत पाटील

पुणे : राज्यातले ठाकरे सरकार हे दिशाहीन सरकार आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी एमपीएससी परीक्षा तसंच मराठा आरक्षणावरून त्यांनी सरकारला प्रश्न विचारले.

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं हे शहाणपण आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही? सरकारमध्ये कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. मुख्यमंत्री तर ‘मातोश्री’मध्येच बसलेले असतात, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.

Post a comment

0 Comments