SBI ची ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प, फक्त ATM सुरू

नवी दिल्ली : देशातली सगळ्यात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेची (SBI) ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प झाली आहे. 
त्यामुळे ग्राहकांचे मोठे हाल होत आहेत. बँकेने आज एक ट्वीट करत यासंबंधी माहिती दिली आहे. सध्या बँकेचे ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले असून फक्त ATM आणि POS मशीन सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. तात्काळ दुरुस्तीचं काम सुरू असून ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावं लवकरच सामान्य सेवा सुरू होईल असं बँकेनं म्हटलं आहे. 

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन सेवा बंद झाली आहे. यामुळे तुम्ही कोणालाही मोबाईल अॅप किंवा मनी टान्सफरिंग अॅपद्वारे पैसे पाठवू शकत नाही. पण ग्राहकांसाठी एटीएम सेवा सुरू असल्याचं बँकेने म्हटलं आहे.

Post a comment

0 Comments