पुण्यात काँग्रेस भवनमध्ये आज बैठक, पदवीधर निवडणूक प्रचारासाठी ‘महाविकास’ची मोर्चेबांधणीनिवडणूक मतदानासाठी अवघा 10 दिवसांचा कालावधी शेष, राजकीय हालचालींना वेग.

पुणे : पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदानासाठी अवघा 10 दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची काँग्रेस भवन येथे बैठक होणार आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनमध्ये ही बैठक होणार आहे. 

शिवसेनेचे प्रमुख नेतेमंडळी आणि पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित असणार आहे. दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत. पुणे पदवीधर मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात उमेदवारांपेक्षा दोन प्रदेशाध्यक्षांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 



भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बंडखोरी टाळण्यात यश आले. पण मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरेंमुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण लाड, भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी मनसेने पदवीधर निवडणुकीत उडी घेतल्याने मतविभाजनाचा फटका टाळण्याचे आव्हान आहे.

पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला बंडखोरी टाळण्यात यश.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर करताच राष्ट्रवादीचे कोल्हापूरमधील नेते प्रताप माने यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 

प्रताप माने यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. प्रताप माने यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आग्रहामुळे उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. 

भाजपने संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना पुणे पदवीधर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. 

रयत क्रांती संघटनेतर्फे प्रा. एन.डी. चौगुले यांनी अर्ज दाखल केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. अखेर सदाभाऊ खोत यांनी त्यांचा उमेदवार पदवीधरची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले.

गेल्या वेळी पुणे पदवीधर निवडणूक निकाल

चंद्रकांत पाटील (भाजप) (विजयी) –  61,453
सारंग पाटील (राष्ट्रवादी)- 59,072
अरुण लाड (बंडखोर)- 37,189
शैला गोडसे – 10,594
शरद पाटील – 8,519

Post a comment

0 Comments