ईडीकडे सत्ताधारी पक्षातील 120 नेत्यांची यादी सोपणार - संजय राऊत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण १२० नेत्यांची यादी ईडी आणि अर्थमंत्रालयाकडे सोपवणार आहे, अशी मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी दिली. तसेच राऊत यांनी महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण १२० नेत्यांची यादी ईडी आणि अर्थमंत्रालयाकडे सोपवणार आहे, अशी मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी दिली. तसेच राऊत यांनी महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, या सगळ्या चौकशा पूर्ण होऊ द्या. त्यानंतर मी १२० नेत्यांची यादी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवणार आहे. या यादीत सत्ताधारी पक्षातील नेत्यांची नावे असणार आहे. मग ईडी कोणाला-कोणाला नोटीस पाठवते पाहूयात, असे राऊत यावेळी म्हणाले.

२० वर्ष जुनी थडगी उकरण्याचे काम सुरु : राऊत म्हणाले की, मला अनेकांनी नोटीस आली का असे विचारले आहे. मी नोटीशीची वाट पाहतोय आहे. 

मला नोटीस आली तरी आश्चर्य वाटणार नाही, असे राऊत म्हणाले. मला, अजित पवार किंवा अन्य कोणाला नोटीस आली तर धक्का बसणार नाही. २० वर्ष जुनी थडगी उकरण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मला कळाली आहे, असे राऊत यांनी सांगितले.

सूडाचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही : देशात घोटाळा करुन लोक देशाबाहेर पळता आहे. एका वर्षात लोकांची संपत्ती वाढता आहे. त्यांची ईडी चौकशी करणार नाही, असो टोला राऊत यांनी लगावला. पण महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची घणाघाती टीका राऊत यांनी केली. 

हे सूडाचे राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू, असा थेट इशारा राऊत यांनी दिला आहे.

मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील:  प्रताप सरनाईक यांनी खुलासा केल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी यांचा काही संबंध नाही. मराठी माणसाने उद्योग करणे, महाराष्ट्रात व्यापार करणे हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करु नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील, असा कडक इशारा राऊत यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments