भाजप आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल, 15 कोटी 75 लाखांचा अपहार केल्याचा आरोप.

आमदार प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर गुन्हा दाखल, बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष


औरंगाबाद : औरंगाबादमध्ये भाजप आमदार प्रशांत बंब  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

आमदार प्रशांत बंब यांच्यासह आणखी सोळा जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
भाजप आमदार प्रशांत बंब  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. आमदार प्रशांत बंब यांच्यासह आणखी सोळा जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. 

प्रशांत बंब यांनी बनावट कागजपत्रं तयार करून सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर कारखान्यातील सभासदांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला गेला. 

पोलिसांनी याची नोंद घेत प्रकरणाचा शोध सुरू केला असल्याची माहिती आहे.
दरम्यान, गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये, यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. 

तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. पण खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही, असे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितले. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला.  मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांची डीआरटी  न्यायालयाकडे पैसे जमा केले होते. 

पण त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून न्यायालयाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. यावर प्रशांत बंब आणि त्यांच्यासह काही जणांनी यावर कारखान्याचे पैसे नसल्याचे म्हटले. या प्रकरणात 14 सभासदांची फसवणूक झाल्याचाही आरोप आहे. यामुळे आता प्रकरणात पोलिस अधिक तपास करत असून प्रशांब बंब यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून न्याय मिळाला नाही तर कारयदेशीर कारवाई करू, असेही सभासदांकडून सांगण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments